
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दैनिक देशदूत (Daily Deshdoot) आणि मराठा विद्या प्रसारक समाज (MVP) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता इशा फाउंडेशनचे (Isha Foundation) जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev) अर्थात सद्गुरू (Sadguru) नाशिककरांशी संवाद साधणार आहेत...
सद्गुरू 'माती वाचवा' (Save Soil) या मोहिमेवर निघाले आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर ते नाशिकमार्गे मुंबईकडे (Nashik to Mumbai) प्रयाण करणार आहेत. ११ जूनला ते सायंकाळी नाशकात पोहोचतील. त्यांनतर ते पाच वाजता नाशिककरांना संबोधित करणार आहेत.
नाशिक भेटीवर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दैनिक देशदूत आणि मविप्रने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची माहिती घेऊन चौकशी केली व उपक्रमाचे कौतुक केले. मातीतील दैनिकाचा हा स्तुत्य उप्रकम आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बागलाणच्या माजी आमदार आणि राज्यमहिला आयोग सदस्य दीपिका चव्हाण, माजी आमदार हेमंत टकले, सनदी लेखापाल शिवदास डागा, पियुष चांडक, कोंडाजी आव्हाड आदी उपस्थित होते.