पोलीस आयुक्तांचा गंभीर इशारा; सहकार्य करा, अन्यथा...

पोलीस आयुक्तांचा गंभीर इशारा; सहकार्य करा, अन्यथा...
दीपक पांडेय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘हेल्मेट नाही - सहकार्य नाही’ (No helmet, no cooperation) या मोहिमेंतर्गत शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट (Helmet) सक्ती करण्यात आली आहे...

दीपक पांडेय
देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' आरोपानंतर हसीना पारकर पुन्हा चर्चेत, जाणून घ्या तिच्याविषयी

हेल्मेट नसलेल्यांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश मिळाल्यास संबंधित आस्थापना, कार्यालयीन-विभाग प्रमुखावर कारवाई होणार आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी शहरातील खासगी, निमशासकीय व शैक्षणिक संस्थाचालकांना पत्र पाठवून संबंधित आस्थापनेच्या प्रमुख अधिकाऱ्याचे नाव, पद आणि संपर्क क्रमांकाची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत मागवली आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी ६ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, कोचिंग क्लासेस, सर्व वाहनतळ, औद्योगिक परिसर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती (Helmet compulsory) केली आहे.

इमारतींच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्यास सांगितले असून विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यालयात येणार नाही, अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. या परिसरात येणाऱ्या चालकांकडे हेल्मेट नसल्यास संबंधित कार्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

दरम्यान, विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यालयांच्या परिसरात आल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद पोलीस आयुक्तांनी केली आहे. त्यात संबंधितांवर दंडात्मक किंवा ८ दिवसांपर्यंत कारागृहात रवानगीच्या शिक्षेची तरतूद आहे. दिवाळीमुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्था कार्यालये बंद होती.

आजपासून ती पुन्हा सुरु झाली आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्त पांडेय यांनी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक संस्थांमध्ये पत्र पाठवून कार्यालयीन प्रमुखाची माहिती मागवली आहे. ही माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार या कार्यालयांमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार शिरल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस दररोज संबंधित सीसीटीव्हीची पाहणी करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

सर्व संबंधित संस्थांना पेट्रोल पंपाप्रमाणे सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले असून त्याची तपासणी रोज होणार आहे. यामध्ये नियमांना डावलून कोणी मोहिमेला सहकार्य करत नसल्याचे लक्षात आल्यास त्यांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com