वंदे भारत
वंदे भारत
नाशिक

हॉटेल उद्योगाला ‘वंदे भारत’चा आधार

विदेशी पर्यटकांना हॉटेल क्वारंटाईन

Gokul Pawar

Gokul Pawar

सातपूर । Satpur

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करण्यात आलेल्या हॉटेल उद्योगांना शासनाने अटी शर्तींवर सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी पर्यटकां अभावी उद्योगांची गती थंड आहे. मात्र देश-विदेशातून येणार्‍या पर्यटकांना वंदे भारत च्या माध्यमातून हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जात असल्याने या व्यवसायाला काहीअंशी ऊर्जितावस्था मिळत असल्याचे चित्र आहे.

जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने अखेरच्या टप्प्यात हॉटेल व्यवसायांना शासनाने अटी शर्तींवर सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र तरीही हॉटेलमध्ये मुक्कामाला येणार्‍या पर्यटकांची संख्या मंदावलेली असल्याने व्यवसायाला गती मिळत नव्हती. शासनाने वंदे भारत ही संकल्पना राबवत परदेशातून येणार्‍या पाहुण्यांनी येण्या-जाण्याच्या ठिकाणाबाबत प्रशासनाकडे दाखल झाल्याबरोबर नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना इच्छित स्थानापर्यंत स्थलांतरित केली जाते त्या ठिकाणच्या नोंदणी केलेल्या हॉटेल्समध्ये सात दिवसांसाठी वैद्यकीय निरीक्षणाखाली क्वारनटाईन केले जाते.

यासाठी प्रशासनाने शहरातील अपार्टमेंट, छोटे, मध्यम व तारांकित हॉटेल्स नोंदीत केलेले आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या पर्यटकांना वैद्यकीय तपासणी करून सोडले जाते. शासकीय रुग्णालयांच्या अधिकार्‍यांच्या माध्यमातून पिपीई कीट द्वारे पर्यटकांची त्यांच्या खोलीतच दररोज तपासणी केली जाते. या सुविधेसाठी वेगवेगळ्या हॉटेल्स मधून प्रतीदिन वेगवेगळे दर आकारण्यात येतात. यात सकाळचा चहा, नाश्ता व दोन वेळचे जेवण समाविष्ट आहे.

या उपक्रमासाठी नोंदणी करणार्‍यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात असलेल्या हॉटेलसह लहान-मोठ्या अनेक हॉटेल्सचा समावेश आहे. या हॉटेल्सची नोंदणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली असून त्यानुसार शहरात आणलेल्या नव्या पाहुण्यांची प्रथम तपासणी होते. त्यानंतर सात दिवस हॉटेल क्वॉरंटाईन, शेवटी अंतिम तपासणीनंतर मुक्त संचार करता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com