त्र्यंबक कोविड कक्षास तीन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

त्र्यंबक कोविड कक्षास तीन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा

तरुणांचा पुढाकार

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबक शहर व व ग्रामीण भागासाठी मोफत ३ मोठे सिलेंडर पुरुषोत्तम कडलग व त्यांचे सहकाऱ्यां मार्फत उपलब्ध करून देण्यात आले.

तालुक्यात करोना रूग्णांचे प्रमाण वाढत असुन अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे.

सध्या अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच अशा बिकट काळात रुग्णांसाठी एक दिलासा मम्हणून कमीत कमी रुग्णालयात बेड मिळेपर्यंत त्याची ऑक्सिजन लेवल खाली जावु नये म्हणुन रुग्णाला ऑक्सिजन मिळावा म्हणुन मोठे ३ सिलेंडर पुरूषोत्तम कडलग व त्यांचे सहकारी कैलास मोरे, अब्दुल मन्सुरी, निलेश पवार, विजय गांगुर्डे, प्रशांत लोंढे, गणेश मोरे यांनी करून दिले आहे.

सदर सिंलेंडर संपल्यास ते पुन्हा भरून देखील दिले जाईल असे पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. दरम्यान एक ऑक्सिजन सिलेंडर नगरपालिके समोरील कोवीड मदत कक्षात देण्यात आले.

त्र्यंबक शहरात ऑक्सिजन सिलेंडरची मदत लागल्यास आमच्याशी संपर्क साधण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com