रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित सुरळित व्हावा

नगरसेविका डाॅ.भालेराव : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा त्वरित सुरळित व्हावा
USER

नाशिक । प्रतिनिधी

मागील आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन सामान्य नागरिकांना मिळविणे दुरापास्त झाले आहे.

अन्न अौषध प्रशासनाने वितरणासाठी विशेष यंत्रणा उभारली असली तरी अजुनही अनेक रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही. रेमडिसिव्हरच्या काळाबाजाराची अनेक प्रकरणे समोर येत असून दोषींवर कडक कारवाई करुन, इंजेक्शनचा पुरवठा सुरळित करा, अशी मागणी भाजप नगरसेविका प्रा.डाॅ.वर्षा भालेराव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेमडीसिव्हरचा काळाबाजार होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मागिल वर्षी २० सप्टेंबरला रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता,साठवणूक आणि काळाबाजार या संदर्भात आवाज उठवून सर्व प्रशासनाला जागे केले होते. त्यानंतर दोनच दिवसात नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधांचा काळाबाजार करतांना एकास रंगेहाथ पकडले होते. अन्न अौषधच्याच्या अधिकारी माधुरी पवार,मनपाचे आरोग्य अधिकारी यांच्याशी रेमडेसीविर संदर्भात अनेकदा बोलले आहे. हे सर्व घडल्यानंतर हि प्रशासनाने या सर्व बाबींकडे कनाडोळा केल्याने नाशिक शहर, जिल्हा व परिसरातील नागरिकांना रेमडेसीविर इंजेक्शन साठी गेल्या अनेक दिवसांपासून वणवण भटकावे लागत आहे.

काही घरात तर माणसे कमी असल्याने पाॅझिटिव्ह रुग्णच आपल्या नातेवाईकासाठी दारोदार फिरतो आहे.आपणांस विनंती आहे की आपण युद्ध पातळीवर यंत्रणा लावून या इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत करावा व ज्यांनी या इंजेक्शन चा स्टॉक दडवून ठेवला आहे व काळाबाजर करीत आहे त्यांना शोधून कडक शासन करावे, अशी मागणी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com