ओझे येथे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

सरपंच, उपसरपंचांनी आहार वाटप थांबवले
ओझे येथे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

ओझे । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे फेब्रुवारी ते एप्रिल या 54 दिवसांचा पोषण आहार प्राप्त झाला असून या आहारातील मूगचा साठा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असून तांदूळ व तूरडाळ हा धान्यसाठा चांगला आहे. त्यामुळे येथील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष यांनी सदर मुगचा साठा परत करण्याची सूचना शाळेय व्यवस्थापना दिली असून संबंधित विभागाने सदर धान्यसाठ्याची चौकाशी करून शाळेला परत नवीन मूगचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.

शासन राबवत असलेल्या योजना त्यांत प्रमुख्याने गणेश, वह्या पुस्तके, पोषण आहार, तसेच वेगवेगळे कडधान्य विद्यार्थ्यांना मोफत देऊन त्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाबरोबरच त्यांची शालेय गुणवत्ता कशी वाढेल, याचा विचार करताना लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु अशा योजना राबवताना कुठेतरी प्रक्रियेत अनियमित आढळून येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. असले प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे उघड होत आहे.

यात शासन आपली जबाबदारी योग्यरितीने पारपाडत असताना दिसते खरे, मात्र या प्रक्रियेत जे काही संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे. त्यांच्याकडून शासनाचा आदेशाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा धान्यसाठा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

अशाप्रकारे आदिवासी भागातील शाळाना कुठे कुठे आशा प्रकारचा निकृष्ट धान्यपुरवठा धान्यपुरवठा झाला यांचा शोधही घेणे महत्त्वाचे आहे.

ओझे येथील निकृष्ट मूगसाठ्या संबंधीत माहिती संबंधीत विभागाला दिली असून त्यांनी त्वरित नवीन चांगल्या प्रकारच्या मुंगाचा साठा शाळेला द्यावा, अशी मागणी ओझे येथील सरपंच आनंदा धुळे, उपसरपंच विमल बर्डे, माजी सरपंच नारायण उघडे, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष शिवाजी उघडे आदींनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com