ओझर येथे पोलीस अधीक्षकांचा रूट मार्च

ओझर येथे पोलीस अधीक्षकांचा रूट मार्च

स्थानिक परिस्थिती पाहून नियम कठोर होणार

ओझर | Ojhar

येथे करोना आटोक्यात न आल्यास केवळ अत्यावश्यक वाहनांना परवानगी मिळणार असून नियम तोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील. या कठीण समयी नियम पळून स्वतः बरोबरच कुटुंबाची घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

ओझर येथे करोना आढावा बैठक व रूट मार्च प्रसंगी त्यांनी गावातील मोजक्या लोकांबरोबर चर्चा केली.

यावेळी ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील रुग्ण संख्येचा आढावा तसेच त्यावरील काय उपाययोजना कोणत्या प्रकारे होत आहे. याचा गाव निहाय आढावा घेतला. पोलीस हे बंदोबस्त तैनात ठेवणार आहे. तर प्रत्येकाच्या कुटुंबातील काळजी स्वतः घेतली तरच कोरोनाला आळा बसणार आहे.

त्यामुळे बेवारसपणे रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता अँटिजेन चाचणी करणार असून करोनाबाधिताच्या घराबाहेर असलेल्या फलक जरी कुणी काढला तरी त्यांच्यावर कारवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांची काळजी जशी पोलीस घेतात तशी आपली देखील जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ओझर मध्ये करोना संख्या वाढत असल्याने अनेक बाधित घरीच क्वारंटाईन झालेले आहे. त्यात गावातील काही तरुणांनी पुढे येत घरपोच जेवण देण्याचे कार्य सुरू केले आहे.

तसेच अंत्यविधी व दफनविधीसाठी गावातील काही तरुणांनी पुढाकार घेत मृतदेह रीतिरिवाजपणे विलीन करण्याचे कार्य हाती घेतले आहे अशा सेवकांचे पाटील यांनी कौतुक करत सन्मान केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com