नाशिकमार्गे गोरखपूरला सुपरफास्ट रेल्वे

रेल्वे
रेल्वे

नाशिक । Nashik

मध्य रेल्वे गोरखपूर- मडगांव दरम्यान सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी सुरु करणार आहे.

ही गाडी आरक्षित राहील. (दि. २२) ऑक्टोबर पासून मुंबई एलटीटी-गोरखपूर सुपर फ़ास्ट विशेष गाडीच्या १२ फेर्‍या होतील. गुरुवारी व सोमवार ही गाडी ५.२३ वाजता प्रस्थान करेल. गोरखपूरहून ही गाडी शुक्रवारी व मंगळवारी निघेल.

नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ येथे ती थांबेल. नागपूर-मडगांव विशेष गाड्याच्या 23 ऑक्टोबरपासून तीन फेर्‍या होतील. दर शुक्रवारी ही गाडी नागपूरहून निघेल.

बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळू, संगमेश्वररोड, रत्नागिरी, राजापुररोड, वैभववाडी रोड, कनकावली, सिंधुदुर्ग, कुडाल, सावंतवाड़ीरोड, थिवंम, करमाली येथे ती थांबेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com