शिवसेना आमदार कांदे, अक्षय निकाळजे यांना समन्स

शिवसेना आमदार कांदे, अक्षय निकाळजे यांना समन्स

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेचे (Shivsena) नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना फोनवरून छोटा राजनच्या (Chota Rajan) पुतण्याने धमकी दिल्याचा प्रकार नुकताच समोर आला...

याप्रकरणी आता शहर पोलिसांनी (Police) चौकशी सुरु केली असून कॉल रेकॉर्डिंगसह (Call recording) सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) गोळा करण्यात आले आहे.

तसेच जाबजबाबासाठी आ. कांदे व छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं आठवले गटाचे युवा विंगचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांना शहर पोलिसांकडून समन्स (Summons) बजावण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून शिवसेना आ. सुहास कांदे व पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्यात वाद सुरु झाले आहेत.

याप्रकरणी आ. कांदे यांनी उच्च न्यायालयात रीट पीटिशन दाखल करीत न्याय मागितला आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२७) सायंकाळी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करून न्यायालयातील रीट पीटिशन मागे घेण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आ. कांदे यांनी केला.

यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला. त्यानंतर अक्षय निकाळजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आ. कांदे हे स्टंटबाजीसाठी खोटे आरोप करत असल्याचे सांगितले.

तसेच टोलनाक्यावर झालेल्या वादासंदर्भात आ. कांदे यांना फोन केल्याचे अक्षय यांनी सांगितले. यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी याची दखल घेत तक्रारीची शहानिशा करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस निरीक्षकामार्फत मोबाइल कॉल डिटेल्स, टोल नाक्यावरील मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज, इतर पुरावे संकलित करत आहेत. त्यामुळे या चौकशीतून आरोपांची सत्यता समोर येणार आहे.

आ. कांदे यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार गुन्ह्याचे गांभीर्य पाहून तसेच दोन्ही पक्षकारांकडून पत्रकार परिषदेमार्फत होणारे आरोप प्रत्यारोपामुळे चौकशी सुरु केली आहे. पोलिस निरीक्षकामार्फत दाेन दिवसांत चौकशी होईल. जाबजबाब घेण्यासाठी आ. कांदे व निकाळजे यांना समन्स पाठवण्यात येणार आहे.

- दीपक पांडेय, पोलीस आयुक्त

Related Stories

No stories found.