उन्हाळी कांदा बियाणे विक्रीस सुरुवात

उन्हाळी कांदा बियाणे विक्रीस सुरुवात

सिन्नर | Sinnar

कांदा हे नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) प्रमुख पिक आहे. सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची (Onion crops) लागवड होते. राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास संस्था, कुंदेवाडी ता. सिन्नर येथे रब्बी, उन्हाळी हंगामातील कांदा बियाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे....

यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेचे स्वत: संशोधित केलेले अग्री फौंड लाईट रेड, रेड ३ आणि रेड ४ या वाणांचा समावेश आहे. अग्री फौंड लाईट रेड वाणाचे कांदे फिकट लाल रंगाचे, ४-६ सेमी व्यास आकाराचे आहे. पीक पुर्नलागवडीनंतर १०० ते १२० दिवसात काढण्यास येते. काढणीनंतर साठवणूक चांगली असून हेक्टरी ३०० ते ३५० क़्वि. उत्पादन क्षमता असणारे वाण आहे.

रेड ३ या जातीचे कांदे फिकट तांबडे रंगाचे, ५.५ ते ६.० सेमी व्यासाचे गोलाकार आकाराचे असतात. पीक पुर्नलागवडीनंतर १२० ते १३० दिवसात काढण्यास येते. काढणीनंतर साठवणूकीस मध्यम असून हेक्टरी ३५० ते ४०० क़्वि. उत्पादन क्षमता असणारे वाण आहे.

रेड ४ या जातीचे कांदे लाल रंगाचे, ५.५ ते ६.० सेमी व्यासाचे गोलाकार आकाराचे असतात. पीक पुर्नलागवडीनंतर ११० ते १२० दिवसात काढण्यास येते. काढणीनंतर साठवणूकीस चांगले असून हेक्टरी ३५० ते ३८० क़्वि. उत्पादन क्षमता असणारे वाण आहे.

या वाणांच्या बियाणाची किंमत ऍग्रीफौंड लाईट रेडकरीता २१०० रुपये, रेड ३ करिता २६०० रुपये आणि रेड ४ करिता २६०० रुपये असून बियाणे सत्यप्रत प्रकारचे आहे.

बियाणांची खरेदी केल्यानंतर सदर बियाणे कोरड्या जागी ठेवावे, बियाणाची पेरणी १ सप्टेंबरनंतर गादी वाफ्यावर, निचऱ्याच्या जागी करावी. पेरणी पूर्वी रोपवाटिकेच्या जागा निर्जंतुक करून घ्यावी तसेच ट्रायकोडर्माचा वापर करावा.

हे बियाणे आजपासून विक्रीस उपलब्ध होणार आहेत. करोनाचे (Corona) नियम पाळून शेतकऱ्यांनी खरेदीस यावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्था, कुंदेवाडी ता. सिन्नर यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com