उन्हाळ कांदा भावात घसरण; लाल कांदा तेजीत

उन्हाळ कांदा भावात घसरण; लाल कांदा तेजीत

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

शेतकर्‍यांच्या दृष्टीने कांदा (onion) नगदी पीक असले तरी तेवढेच बेभरवश्याचे झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाळ कांदा (Summer onion) दरात चढउतार पहायला मिळत आहे.

सोमवार दि.29 रोजी कालच्या तुलनेत मंगळवार दि.30 रोजी उन्हाळ कांदा दरात 150 रुपयांची घसरण पहायला मिळाली. तर लाल कांदा दरात सरासरी 600 रुपयांची वाढ दिसून आली. येथील बाजार समितीत (market committee) उन्हाळ कांद्याला सरासरी 1551 रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला (red onion) सरासरी 1851 रु. भाव मिळाला. दक्षिणेकडील तामिळनाडू (Tamil Nadu), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) तसेच कर्नाटकात अवकाळी पावसाचा तडाखा नवीन कांद्याला बसला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) कांद्याची मागणी वाढत आहे. बाजारात सध्या नवीन लाल कांद्याची कमी प्रमाणात आवक सुरू आहे. महाराष्ट्रातील कांदा चवीला उत्कृष्ट असल्याने देशात आणि देशाबाहेर मागणी असते. महाराष्ट्रभर कर्नाटक (Karnataka), गुजरात (gujrat), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), राजस्थानमध्ये (rajasthan) मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. दक्षिणेकडील राज्यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात कांदा लागवड केली जाते.

तेथील कांदा स्थानिक पातळीवरील गरज भागवितो. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील काही भागात कांद्याचे नुकसान झाले आहे. सध्या बाजार समितीत उन्हाळ कांदा विक्रीस येत आहे. मात्र उन्हाळ कांदा सात ते आठ महिन्यांचा झाल्याने त्याच्या प्रतवारीत कमालीची घट झाली आहे.

तर दुसरीकडे चांगला भाव मिळेल या आशेने साठवलेल्या कांद्याला 700 ते 1551 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशा दिसत आहे. दरम्यान लासलगाव बाजार समितीत मंगळवारी 954 वाहनांमधून 15 हजार 563 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात उन्हाळ कांदा 365 नंतर लाल कांदा 528 नग बाजारात दाखल झाले. उन्हाळ कांदा कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1951 रुपये तर सरासरी भाव 1551 रुपये होता तर लाल कांद्याला कमीतकमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3251 रुपये तर सरासरी भाव 1891 रुपये होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com