गाजर दाखवणार्‍यांना फसू नका: करंजकर

सुळेवाडीकरांचा शिवसेनेत प्रवेश
गाजर दाखवणार्‍यांना फसू नका: करंजकर

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

जे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या परिसरासाठी, आपल्या लोकांसाठी मेहनत घेतात, त्यांच्याविषयी आपण जागले पाहिजे. पाच वर्षातून एकदा येऊन लोकांना गाजर दाखवणार्‍यांना फसू नका असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Shiv Sena district chief Vijay Karanjkar) यांनी केले.

तालुक्यातील सुळेवाडी येथे विविध विकासकामांचे भुमिपुजन (Bhumipujan of development works) करंजकर व माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Vaje) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी परिसरातील विविध पक्षातील 100 कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत (shiv sena) प्रवेश केला. यावेळी उदय सांगळे, संजय सानप, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, रामनाथ धनगर उपस्थित होते. निवडणूक (election) आल्या की बोगस मतदारांचा सुळसुळाट सुरु होत असतो. मागील निवडणूकीतही बोगस मतदारांमुळे मतदानावर परिणाम झाला.

त्यामुळे अन्य गावांतून मतदानासाठी (voting) येणारे बोगस मतदान रोखण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी (shiv sana) पार पाडण्याचे आवाहन करंजकर यांनी केले. गोदावरी उपसा सिंचन योजनेचे कर्ज माफ करण्याबरोबरच परिसरातील रस्ते, सभामंडपाची कामे या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गोदावरी उपसा योजनेचे कर्ज माफ होण्यासाठी आपण विधानसभेत पाठपुरावा केला. सेझकरता संपादीत होणारे क्षेत्र वगळण्यात आपल्याला यश आल्याचे राजाभाऊ यांनी सांगितले.

माजी आमदार वाजे, खासदार हेमंत गोडसे (mp hemant godse) व जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) माध्यमातून झालेल्या कामांबरोबरच भविष्यात होणार्‍या कामांची माहिती सानप यांनी दिली. 30 लाखांच्या निधीतून (fund) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) उभारण्यात येणार आहे. भविष्यात स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आणखी निधी उपलब्ध करणार असल्याचे सानप यांनी सांगितले. यावेळी बाळू निकम, गणेश लांडगे, समाधान कुर्‍हाडे, नवनाथ देवकर, भानुदास आरोटे, संदीप गुंजाळ, नितीन डावखर, राजेंद्र डावखर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.