'सुला'चे संस्थापक राजीव सामंत यांना लंडनचा जीवनगौरव पुरस्कार

'सुला'चे संस्थापक राजीव सामंत यांना लंडनचा जीवनगौरव पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी

सुला विनियार्डचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांना नुकतेच इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी कौन्सिल (आयएचसी) लंडनने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ पासून आयएचसी तर्फे हा पुरस्कार दिला जातो...

भारताला जगातील वाईनक्षेत्रात प्रस्थापित करण्याबद्दल आणि हॉस्पिटॅलिटी व वाइन पर्यटन क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राजीव सामंत यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार एका ऑनलाइन समारंभात प्रदान करण्यात आला.

जागतिक स्तरावर भारताच्या वाईन उद्योगाचा एक अग्रगण्य चेहरा आणि वक्ता असण्यासोबतच, राजीव सामंत हे राज्य आणि राष्ट्रीय सरकार पातळीवर भारतीय वाईन उत्पादक आणि शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठी सक्रियपणे प्रतिनिधित्व करत आहेत.

“मी जेव्हा २० वर्षांपूर्वी सुला सुरू केली तेव्हा बर्याच लोकांची प्रतिक्रिया होती की, 'हा वेडा माणूस कोण आहे?.' मला हे मान्य करावे लागेल की हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, परंतु जेव्हा मी सुलाने आतापर्यंत काय साध्य केले आहे, आमची टीम कुठल्या पातळीवर बांधली गेली आहे हे बघतो तेव्हा मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो. आयएचसी सारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून आज हा पुरस्कार मिळणे म्हणजे सन्मानाची बाब आहे.

राजीव सामंत, संस्थापक सुला विनयार्ड्स, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com