'सुला विनयार्ड्स'ची करोना लढ्यासाठी एक कोटींची मदत

'सुला विनयार्ड्स'ची करोना लढ्यासाठी एक कोटींची मदत

नाशिक | प्रतिनिधी

कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी सुला विनयार्डसकडून १ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही मदत ‘पीएम केअर्स’, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी आणि कर्नाटक कोरोना रिलीफ फंड याठिकाणी विविध निधीमार्फत देण्यात येणार आहे....

या देणगीचे स्वरूप, ३० लाख रुपये ‘पी एम केयर’, ३० लाख रुपये महाराष्ट्र राज्य 'मुख्यमंत्री मदत निधी - कोविड -१९', आणि १० लाख रुपये कर्नाटक मुख्यमंत्री मदत निधी यांना त्वरित देण्यात येतील. तसेच ३० लाख रुपये नाशिक मधील स्थानिक मदत कार्यसाठी आणि सी एस आर प्रकल्पांसाठी पुढील महिन्यात देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे.

सुला विनियार्डसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत या विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "देशात थैमान घालत असलेल्या या महाविदारक कोविड-१९ संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी देशातील जबाबदार नागरिकांनी लवकरात लवकर पुढे येणे गरजेचे आहे.

मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आम्ही त्वरीत १ कोटी रुपयाचा निधी देत आहोत. सुला विनयार्डस कार्यरत असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत या निधीचा फायदा होऊ शकेल. या महाविनाशक संसर्गाशी पुढे होऊन दोन हात करणाऱ्या योद्धांना आम्ही सहकार्य करत आहोत. या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत."

देणगी देण्याचे हे पाऊल म्हणजे कंपनीकडून कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचे द्रावक परिणाम कमी करण्यासाठीचा एक महत्वाचा प्रयत्न आहे.

२०२० मध्ये देखील सुला विनयार्डस ने 'पी एम केयर' आणि 'महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी साठी २० लाख रुपयांची देणगी दिली होती.

देशभरात काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी कंपनीने 'वी केयर' हा कार्यक्रम देखील सुरु केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ प्रतिबंधक लशीचा खर्च देखील सुलातर्फे केला जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com