कसबे सुकेणे। प्रतिनिधी Kasbe Sukene

कसबे सुकेणे येथे रेल्वे विभागातर्फे अप आणि डाऊन लाईन चे दुरुस्तीचे काम करावयाचे आहे .

सोमवार दि.28 ते बुधवार दि.30 पर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चांदोरी ते सुकेणे रस्त्यावरील रेल्वे गेट क्रं.96 हे सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार आहे .

या काळात शेतकरी व ग्रामस्थांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन नाशिक रोड रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनिअर यांनी केले आहे.

याबाबतचे पत्र त्यांनी कसबे सुकेणे स्टेशन प्रबंधक, मौजे सुकेणे, कसबे सुकेणे व निफाड बसस्थानक, पोलीस पाटील, चांदोरी ग्रामपंचायत, चांदोरी पोलीस स्टेशन यांना दिले आहे.