वनविभागाच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या

वनविभागाच्या हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या

नांदगाव। प्रतिनिधी

नांदगाव शहरातील सेवानिवृत्त छगन मुरलीधर सोर वय (वर्षे ७०) यानी मालेगांव रस्त्यावर गावापासून काही अंतरावर असलेल्या निसर्ग हॉटेल पाठीमागे वनविभागाच्या हद्दीत झाडाला दोरी लावून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या वृतामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे .

पोलीसानी दिलेली माहिती अशी कि, नांदगाव शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव रस्त्यानजिकच्या निसर्ग हाॅटेलच्या पाठिमागील वन विभागाच्या जंगलात छगन मुरलिधर सोर (वय 70) (रा. राधाजीनगर, साकोरारोड, नांदगाव) यांनी निंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची खबर शिवाजी बबन सोर यांनी पोलिसांना दिली.

आत्महत्याचे कारण न समजल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास पोलीस हवालदार राजु मोरे हे करित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com