दुर्दैवी : आत्महत्या प्रतिबंध दिनीच तिघांच्या आत्महत्या

आत्महत्या
आत्महत्या

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या (World Suicide Prevention Day) पूर्वसंध्येला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये वयोवर्ष २५ च्या आतील युवकांचा समावेश आहे. ऐण तारूण्यात आलेल्या तिघांनीही मृत्यूला कवटाळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन १० सप्टेंबर रोजी संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. यामध्ये अनुभव सांगणे, मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त करणे. तसेच या विचारांपासून परावृत्त होऊन आपण आपले अमूल्य आयुष्य सुंदरतेने जगणे या विचारांचा प्रचार प्रसार केला जात आहे.

संपूर्ण जगभरात हे दृश्य असले तरी नाशिकमध्ये (Nashik) तीन पंचविशीच्या आतील युवकांनी आत्महत्या केलेली असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत राम कापरी (यादव) (१९, रा. केवल दर्शन अपार्टमेंट, अंबड लिंड रोड) याने अंबड औद्योगिक वसाहतीतील सत्यम पॉली कंटेनर कंपनीमध्ये गळफास घेतला. श्रीकांतच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक महाजन अधिक तपास करीत आहे.

दुसरी घटना मखमलाबाद नाका परिसरात घडली आहे. आदेश संतोष घोलप (२१, रा. आव्हाड चाळ, जाधव कॉलनी, मखमलाबाद नाका) याने राहत्या घरातील स्वयंपाक रूममध्ये छताच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आदेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचववटी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नेमाणे अधिक तपास करत आहे.

तिसरी घटना पाथर्डीगाव परिसरात उघडकीस आली आहे. विकास सर्जेराव धायजे (२५, रा. भीमवाडी, सहकार नगर, गंजमाळ) याने सुखदेवनगर (पाथर्डीगाव) याठिकाणी असलेल्या शेडमध्ये बल्लीला दोरीने गळफास घेतला. त्यात विकासचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार शेख अधिक तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com