पती-पत्नीच्या आत्महत्येने मालेगाव हादरले

पती-पत्नीच्या आत्महत्येने मालेगाव हादरले

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

शहरातील डी. के. चौक परिसरातील माऊली चौकात (Mauli Chowk) वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीने (Husband and Wife) घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज दिगंबर बिरारी (४५) व रेणुका पंकज बिरारी (४०) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्यांची नावे आहेत. बिरारी यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय असून काल सायंकाळी पंकज व रेणुका यांनी नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलास खेळण्यासाठी घराबाहेर पाठवले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलगा (Son)घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद असल्याने त्याने तो ठोठावला. पंरतु, दरवाजा उघडला जात नसल्याने मुलाने मम्मी-पप्पा अशा आरोळ्या मारल्या. मात्र, तरी देखील दरवाजा उघडला न गेल्याने मुलाने घाबरून हा प्रकार शेजाऱ्यांना सांगितला.

पती-पत्नीच्या आत्महत्येने मालेगाव हादरले
सावधान! केळी खाताय? आधी 'हा' व्हिडीओ पाहा...

त्यावेळी शेजाऱ्यांनी पंकज व रेणुका यांच्या नावाने आवाज देत दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांनी हा प्रकार पंकजच्या शालकांना मोबाईल फोन करत सांगितल्याने त्यांनी तातडीने घरी येत या दोघांच्या नावाने आवाज दिला. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने उपस्थितांनी दरवाजा तोडला असता पंकज यांनी हॉलमध्ये तर रेणुका यांनी किचनमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले.

पती-पत्नीच्या आत्महत्येने मालेगाव हादरले
‘वेड’ने लावलं प्रेक्षकांना वेड; सर्वाधिक कमाई करत मोडला 'या' बड्या चित्रपटाचा विक्रम

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात (Hospital) हलविले असून या घटनेचे वृत्त शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे. तसेच आर्थिक विवेंचनेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून पोलीस यंत्रणा अधिक तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com