नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

सिन्नर तालुक्यातील घटना
नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

डूबेरे | Dubere

उच्च शिक्षण (Higher Education) घेऊनही नोकरी मिळत नसल्याच्या (Job नैराश्यातून(Depression from not getting a job) तरुणाने राहत्या घरात गळफास(Suicide) घेऊन जीवन संपवल्याची घटना शनिवारी (दि.3) दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.

अक्षय परशराम ढोली (२५)(Akshay Dholi) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ढोली वस्तीवर आपल्या आई-वडिलांबरोबर अक्षय राहत होता. शेती काम करून आई वडीलांनी अक्षयला उच्च शिक्षण दिले.

डिग्रीचे शिक्षण (Graduation) घेवूनही नोकरी मिळत नसल्याने मित्रांबरोबर तो मोलमजुरीचे काम करत होता. तिच चिंता त्याला सतावत होती. शेवटी आज त्याने टोकाची भूमिका घेत आपले जीवन संपवले. मनमिळाऊ स्वभावाच्या अक्षयने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com