आत्महत्या
आत्महत्या
नाशिक

दिंडोरी : कौटुंबिक वादातून युवकाची आत्महत्या

अकस्मात मृत्यूची नोंद

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील 33 वर्षीय युवकाने घरगुती वादातून गळफास लावुन घेत जीवनयात्रा संपविली.

रमेश गोपीनाथ भुसार रा.कोल्हेर असे या तरुणाचे नाव आहे. याने घरगुती वादातून घराच्या छताला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रमेशला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com