स्वतःचा व्हिडिओ काढत विद्यार्थ्याने संपवले जीवन

स्वतःचा व्हिडिओ काढत विद्यार्थ्याने संपवले जीवन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

वावरे महाविद्यालयात शिकणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने माेबाईलमध्ये आत्महत्येचे (Suicide) चित्रीकरण करुन गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उपेंद्रनगरनजीक घडली...

प्रथमेश प्रकाश बाेरसे (Prathmesh Borse) (२१, रा. सहावा मजला, विजयालक्ष्मी हाईट्स, सिम्बाॅयसिस काॅलेजसमाेर, उपेंद्रनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रथमेशने रविवारी रात्री आई-वडील जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले असल्याची संधी साधत स्वत:च्याच माेबाईलमध्ये आत्महत्या करतानाचा व्हिडिओ तयार केला.

तसेच प्लास्टिक पिशवीने स्वतःचा चेहरा झाकत नंतर ओढणीने गळफास घेतला. त्याचे आई वडील घरी परतले असता प्रथमेश दरवाज्या उघडत नसल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा ताेडला.

तेव्हा प्रथमेशचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवन परदेशी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com