पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आडगाव येथील ग्रामीण पाेलिस मुख्यालयातील Rural Polis headquarters at Adgaon तरुण पाेलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या Suicide केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून आडगाव पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

अक्षय आंधळे (वय २६, रा. मूळ रा. ठाणगाव, ता. सिन्नर, सध्या रा. आडगाव पाेलिस मुख्यालय) Akshay Aandhleअसे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. अक्षय हा सन २०१८ च्या भरती सत्रातील कर्मचारी हाेता. त्याची नेमणूक आडगाव पाेलिस मुख्यालयात हाेती. तसेच ताे पत्नीसह येथे राहत हाेता.

रविवारी (दि. १४) दुपारी त्याने काहीतरी कारणातून पोलीस मुख्यालयातील बिल्डिंग नंबर १० मधील रुम नंबर ९ येथे गळफास घेत जीवन संपवले. गेल्या वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला हाेता. तसेच सात ते आठ दिवसांपूर्वीच त्याची पत्नी दिवाळी निमित्त माहेरी गेली हाेती. ताे चांगल्या स्वभावाचा होता, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. अचानक त्याने हे पाऊल का उचलले, याबाबत आता आडगाव पाेलिस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com