विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

येथील जेलरोड परिसरात (Jailroad Area) राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या राहुल नगर (Rahul Nagar) परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या राहत्या घरी पंख्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, दीक्षा दिलीप खाडे (२७) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या महिलेचे नाव असून या महिलेने आपल्या राहत्या घरी पंख्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरचा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी ही घटना नाशिकरोड पोलिसांना कळवली.

दरम्यान, या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून या महिलेने आत्महत्या का केली याबाबतचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. तसेच पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com