पळसे येथील विवाहितेची आत्महत्या

पळसे येथील विवाहितेची आत्महत्या

नाशिकरोड | Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) असलेल्या पळसे या गावी पस्तीस वर्षाच्या विवाहितेने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या (Women Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Tyane) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...

ज्योती मनोज गायधनी (Jyoti Gaydhani) या विवाहितेने आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. सदरची घटना नातेवाइकांना समजताच तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान या महिलेचे निधन झाले.

सदर घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार विलास उजागरे हे करत आहे. विवाहितेने आत्महत्या का केली याबाबतचे निश्चित कारण समजू शकले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com