कौटुंबिक वादातून नाशकात डॉक्टरची आत्महत्या

कौटुंबिक वादातून नाशकात डॉक्टरची आत्महत्या

नाशिक | Nashik

शहरातील पंचवटी परिसरातील (Panchavti Area) एका डॉक्टरांने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश कुमार पोपटलाल छाजेड (Nilesh Kumar Popatlal Chhajed) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांनी पंचवटी परिसरातील चिंचपाणी येथील घरात सोमवारी (दि.५) ७.३० वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.

छाजेड हे आठ वर्षांपासून शहरातील एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) वैद्यकीय सेवा देत होते. कौटुंबिक वादातून (Family disputes) त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) वर्तवला आहे.

तर छाजेड यांनी घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांनी पाहिले असता त्यांना तात्काळ ते कार्यरत असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टर राठी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com