पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक | निशिकांत पाटील

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाला जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये असलेल्या संशयिताने पोलीस ठाण्याच्याच लॉकअप मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की विशाल संतोष कुराडे (१९, रा. चुंचाळे घरकुल योजना अंबड, नाशिक) याच्यावर वाढदिवसाचा केक कापत असताना एकावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांसहअंबड पोलीस ठाणे अंकित एमआयडीसी चिंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी संशयित कुराडे हा पोलीस कोठडीत असताना त्याने पोलीस कोठडीमध्ये असलेल्या शौचालयामधील फरशीच्या साह्याने हाताला कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कुराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

अंबड पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये संशयिताने फरशीला हत्यार बनवत आत्महत्याचा प्रयत्न केला ही बाब पटण्यासारखी नसली तरी फरशी ही हत्यार असू शकते का ? आणि जर फरशीने असा प्रकार झाला असेल तर यापुढे न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीत राहणारा संशयित आरोपी सुरक्षित आहे का ?असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com