सौंदाणे -देवळा रस्त्यावर उसाचा ट्रक पलटी

सौंदाणे -देवळा रस्त्यावर उसाचा ट्रक पलटी

दहिवड | वार्ताहर Dahivad

आज रात्री आठ वाजेच्या सुमारास सौंदाणे देवळा रस्त्यावरील Soundane- Deola Road हॉटेल देश-विदेश जवळील अवघड वळणावर चाळीसगाव येथून ऊस sugargane भरून वसंत दादा सहकारी साखर कारखाना विठेवाडीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 17 टी 7300 अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी जवळ पलटी झाला truck overturned on Saundane-Deola road .

सुदैवाने चालक क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली असून याच वळणावर मागील दोन वर्षांपूर्वी बसचा ताबा सुटल्याने बस व रिक्षा चा अपघात होऊन रिक्षा व बस विहिरीत पडून 26 लोक मृत झाल्याचे आठवणी ताज्या झाल्या.

अपघाताचे वृत्त समजताच दहिवड तंटामुक्तीचे अध्यक्ष व हॉटेल देश-विदेशचे मालक गणेश देवरे, किरण भारती, बापू आहिराव, संदीप साळुंके, गणेश भारती आदींनी मदत कार्य करून जखमींना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com