रब्बी हंगामात बळीराजाला उसाची गोडी

रब्बी हंगामातील पेरणी निम्म्याच्यावर
रब्बी हंगामात बळीराजाला उसाची गोडी

ओझे : Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील सध्या रब्बी हंगामाची लगीन घाई सुरू असुन रब्बी हंगामात बळीराजाने ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

मागील वर्षी करोनाची सुरुवात आणि रब्बी हंगामाचा प्रारंभ एकाच वेळी झाला होता. परंतु त्यावेळी कोरोनाचा प्रसार व माहिती नागरिकांना जास्त माहिती नव्हती. त्यामुळे बळीराजांने रब्बी हंगाम आपल्याला चांगले उत्पन्न मिळून देईल. या आशेवर बळीराजाने कंबर कसली होती.

परंतु करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाला रब्बी हंगामात उत्पन्न मिळण्यापासुन माघार घ्यावी लागली. कारण याच काळात शेतकरी वर्गाने पिकविलेला भाजीपाला, फळे, नगदी पिके या कोरोनामुळे लाँकडाऊनची परिस्थिती, वाहन बंदी, आठवडे बाजार बंदी इ. मुळे रब्बी हंगामाची पुर्णपणे वाट लागली.

त्यामुळे जवळ चे राहिलेले थोडे फार भांडवल घेऊन खरीप हंगाम घेतला. परंतु या हंगामातही बळीराजां चारी मुंड्या चित झाला. हे सर्व बाजूला ठेवून यंदाच्या रब्बी हंगामासाठी बळीराजाने कंबर कसली असुन मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये. अशी भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.

तरीपण या वर्षी बळीराजांने रब्बी हंगामाची जोरदार सुरुवात केली असून त्यामध्ये गहू, हरभरा, भाजीपाला, तसेच ऊस इ. पिके घेण्याकडे कल दिला आहे. बहुतेक शेतकरी वर्गाने चांगल्या प्रकारांचे ऊस बेणे उपलब्ध करून ऊस लागवड करण्यावर भर दिली आहे.

तालुक्यात यंदा पाऊस दर वर्षीच्या तुलनेत कमी पडला असला तरी आहे. या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास गहू, हरभरा हे पिके चांगल्या प्रकारे येवू शकतात सध्या ऊसाचे क्षेत्र तालुक्यात वाढताना दिसत आहे.

दिंडोरी तालुक्यातील रब्बी हंगामातील जवळ जवळ ६० ते ७० टक्के पेरणी पुर्ण झाली असली तरी अजून पेरणी चालू आहे. तालुक्यात डिंसेबर पर्यत गहू हरबरा पेरणी चालू राहते रब्बी हंगामावर बळीराजांची अपेक्षा वाढली असून मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये आशी भिती शेतकरी वर्गाला वाटत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com