पंचाळे l Panchale (वार्ताहर)

सिन्नर व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील पूर्व भागातील भरतपूर (विघनवाडी) येथे विजेच्या असाच या पिकामध्ये उसाच्या पिकाचे विज तारांचे घर्षण होऊन शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या पिकाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज (दि. २१) रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान भरतपूर फाट्या लगत असणाऱ्या झापेवाडी मिरगाव रस्त्यालगत हिराबाई राजाराम गवांदे (लक्ष्मणपुर) यांच्या मालकीच्या गट नंबर ७३/३ मधील उसाच्या पिकास विजेच्या तारांचे घर्षण होऊन दोन एकर (८० गुंठे) क्षेत्रातील ऊसाला आग लागली त्यामुळे उसाचे पूर्ण क्षेत्र जळून खाक झाले.

भरतपूर येथील शेतकरी विलास गवांदे यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला या घटनेची खबर दिली .परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी हजर झाल्या, परंतु तो पर्यंत संपूर्ण ऊस उसाचे क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

वीज वितरण कंपनी टाकलेल्या खांबांवरील तारा अत्यंत खाली आलेल्या असून त्यास स्पेसर न बसवल्याने वार्याच्या झोताने आग लागली. उसाच्या क्षेत्रामध्ये पाणी देण्यासाठी ड्रीप पाईप लाईन केली होती. त्यामुळे या आगीमध्ये ८० गुंठे उसाचे क्षेत्र ड्रीप पाईपअसे तीन लाख रुपयेचे नुकसान झाले आहे.

साधारणतः शंभर टन ऊस उत्पादन निघाले असते. परंतु वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे या उसाचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा महसूल विभागाच्या वतीने पंचनामा केला असून शेतकऱ्यास वीज वितरण कंपनीने ऊसाची भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी हिराबाई गवांदे यांनी केली आहे.