जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार

उपाध्यक्षपदी मंदाकिनी पवार
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार तर उपाध्यक्षपदी मंदाकिनी पवार यांची निवड झाली.पगार हे तिसऱ्यांदा अध्यक्ष पदाची तर पवार या प्रथमच उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतील. 

बँकेचे  अध्यक्ष भाऊसाहेब खातळे व उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी आवर्तन पध्दतीनुसार पदाचा राजीनामा दिला.त्या पाश्‍वभुमीवर पदाधिकारी निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा गुरुवारी(दि.२०) झाली.अध्यक्षपदासाठी सुधीर पगार तर उपाध्यक्षपदासाठी मंदाकिनी पवार  यांचे उमेदवारी अर्ज आले.संचालक मंडळाने पगार व पवार यांना कौल दिला. तत्पूर्वी अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदासाठी एकापेक्षा अधिक इच्छुक असल्यामुळे संचालक मंडळ अंतर्गत कौल घेण्यात आला.त्यानंतर ही बिनविरोध निवड पार पडली.

नाशिक येथील बँकेच्या  समता सभागृहात झालेल्या बैठकीस समता पॅनलचे नेते रमेश राख,महेश आव्हाड, भाऊसाहेब खातळे,एन.डी.सानप,उत्तमराव देशमाने,अशोक गुळेचा,महेंद्र बार्हे ,विजयकुमार हळदे, सुनिल बच्छाव,दिलीप थेटे, शिरीष भालेराव,अशोक शिंदे,दीपक आहीरे,प्रविण भाबड,अजित आव्हाड, सुभाष पगारे,मंगेश पवार, प्रशांत कवडे,धनश्री कापडणीस,प्रकाश क्षीरसागर,सुरेश पाटील,आण्णासाहेब बडाख,सभासद संजाली पाटील,राजेश आहीरे,संदीप दराडे,रविंद्र भडांगे, किरण निकम,सुनिल आहिरेआदी उपस्थित होते.

   बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळाला विश्‍वासात घेऊन कामकाज करणार आहे.संस्था व सभासदांचे हित जोपासुन निवड सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे.

- सुधीर पगार(अध्यक्ष,कर्मचारी बँक)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com