कोविड केंद्रांना अचानक भेटी
नाशिक

कोविड केंद्रांना अचानक भेटी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येवला व निफाड तालुक्यातील कोविड केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांनी अचानक भेटी देऊन पहाणी केली.

कोवीड केअर केंद्रामधील औषध साठा ,मनुष्यबळ, रुग्णांसाठी असलेले जेवण व इतर सोयी सुविधां विषयी माहिती घेतली व मार्गदर्शन केले. यामध्ये रुग्णांसाठी योगासनाबाबत मार्गदर्शन करनण्याबाबत सूचना केली. रुग्णांच्या मनोरंजनासाठी बैठे खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. रुग्णांची संवाद साधून त्यांची विचारपूस केली उपचाराबाबत उपलब्ध सोयी सुविधांबाबत चर्चा केली.

तसेच केंद्रावर उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक यांना स्वतःची काळजी घेऊन रुग्णसेवा चांगल्या प्रकारे देण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही प्रकारचे रुग्णांना त्रास होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध सुविधेबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com