खासदार भारती पवार
खासदार भारती पवार
नाशिक

मनमाड, नांदगाव कोविड सेंटरला खा.पवारांची अचानक भेट

भेटीत अनेक बाबी उघड

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

मनमाड, नांदगाव येथील कोविड सेंटरबाबत रुग्णांच्या रुग्णांच्या वाढत्या तक्रारी प्राप्त होताच या तक्रारी जाणून घेण्यासाठी मनमाड, नांदगाव येथील कोविड सेंटरला दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी अचानक भेट दिली.या भेटी दरम्यान सर्वच परिस्थितीचा आढावा घेतला असता काही तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे त्यांना दिसले.याबाबत खा.पवार यांनी सबधितांची कानउघाडणी करत रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचे आदेश त्यांनी दिले.

नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा प्रसार आता ग्रामीण भागातही सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.बरेच रुग्ण तेथे उपचारासाठी भरतीही केले आहेत.मात्र,बऱ्याच ठिकाणाहून रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.रुग्णांच्या या तक्रारी जाणून घेण्यासाठी मनमाड, नांदगाव येथील कोविड सेंटरला दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी अचानक भेट दिली.

तेथील सर्वच परिस्थितीचा आढावा घेतला असता काही तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे दिसले.मनमाड, नांदगाव येथील कोविड सेंटरमध्ये तत्काळ सेवेसाठी 108 रुग्णवाहिकांची नितांत गरज आहे. तेथील रुग्णांना डिस्चार्ज करतेवेळीही हलगर्जीपणा केला जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच कोविड सेंटरला भारतीय जनता पक्षाच्यावतीने स्टीमर उपलब्ध करून दिले जातील.

रुग्णासाठी योगा सुरू करावा.त्यासाठीही गरज पडल्यास किंवा मागणी केल्यास योगा स्वयंसेवक उपलब्ध करून देऊ, रुग्णालयात रुग्णांना सकस आहार द्यावा, स्वच्छतेची काळजी घ्यावी. रुग्णांना कुठलीही अडचण न येता योग्य काळजीपूर्वक उपचार झाले पाहिजे.तसेच या दरम्यान रुग्णांचे मनोधैर्य कसे टिकवून राहील याकडेही लक्ष देण्याच्या सूचना खा.डॉ.भारती पवार यांनी केल्या.

दरम्यान, नांदगाव येथे मका खरेदी केंद्रावरही खा.पवार यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com