नाशकात अवकाळी पाऊस; शेतकरी चिंतेत

नाशकात अवकाळी पाऊस; शेतकरी चिंतेत
नाशिक पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अवकाळी पावसाने (Rain) आज पुन्हा जोर धरला असून शहरात सायंकाळी पावणे सातच्या सुमारास मुसळधार पाऊस पडू लागल्याने शेतकरीवर्ग चिंतेने ग्रासला आहे...

आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दपारी चारपासून शहरात पावसाची रिमझिम सुरु झाली. सुरुवातीस सातपूरपासून द्वारका परिसरात पाऊस झाला. सायंंकाळी पावणे सातच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लवली. पावसाचा जोर एवढा होता की, थोडा वेळ आलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले.

या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. येत्या तीन-चार दिवसात राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंंदाज हवामान खात्याने (imd) याआधीच व्यक्त केला आहे. त्यानुसार वातावरणात बदल होताना दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com