जिल्हा रुग्णालयात आवाजाने खळबळ; गॅसगळती नसल्याचा निर्वाळा; सर्व रुग्ण सुखरूप

जिल्हा रुग्णालयात आवाजाने खळबळ; गॅसगळती नसल्याचा निर्वाळा; सर्व रुग्ण सुखरूप

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या गॅस लाईननजीक मोठा आवाज झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची गांभीर्यता लक्षात घेत घटनास्थळी अग्निशमन विभागाचे जवान दाखल झाले होते.

दरम्यान, सक्शन कॉम्प्रेसरनजीक व्हॉल्वचा याठिकाणी आवाज झाल्याचा निर्वाळा अग्निशमन विभागाने दिला असून याठिकाणी कुठलीही गळती झाली नसून सर्व रुग्ण सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच आज रात्री जिल्हा रुग्णालयात गस गळतीबाबतचा कॉल अग्निशमन विभागास प्राप्त झाला. दरम्यान, संपूर्ण तपासणी करून झाल्यानंतर याठिकाणी कुठलीही गळती झाली नसल्याचे समोर आले.

आपल्याकडे तीन सक्शन कॉम्प्रेसरच्या लाईन आहेत. यातील एका लाईनला प्रोब्लेम आलेला होता. कपलिंग व्हॉल्वचा आवाज झाला होता. कुठल्याही रुग्णाला यामुळे काहीही झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

फक्त आवाज झाल्याने कर्मचाऱ्यांसह काही रुग्ण बिथरले होते. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी 'देशदूत'ला दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com