नाशिक 'सिव्हिल'मध्ये अतिअवघड रक्ताशयाच्या आजारावरील शस्त्रक्रिया

नाशिक 'सिव्हिल'मध्ये अतिअवघड रक्ताशयाच्या आजारावरील शस्त्रक्रिया
नाशिक सिव्हील

नाशिक | Nashik

दोन - अडीच वर्षांपासून लढत असलेल्या गर्भपिशवीमधील रक्तशयाच्या (Fetal-maternal hemorrhage) आजारावर जिल्हा सामान्य रुग्णालयात (District Civil Hospital) यशस्वी शस्त्रक्रिया (Operation) करण्यात आली आहे.

या महिलेला अप्लास्टिक एनिमिया (Aplastic Anemia) हा दुर्धर असा रक्तशयाचा आजार जडला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शस्त्रक्रियेमधून महिलेला जीवदान मिळाले आहे.

दरम्यान, अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Complicated surgery) यशस्वी झाल्याने कुटुंबीयांचा देखील जीव भांड्यात पडला आहे. या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च येणार होता मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात आल्याने कमी पैशात पण कायमस्वरूपी इलाज झाल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

अडीच वर्षांपासून महिलेला अप्लास्टिक एनिमिया हा आजार जडला होता. त्यामुळे महिलेला दर दोन दिवसांनी रक्त द्यावे लागत होते. ही महिला सिव्हिलमध्ये (Civil Hospital Nashik) दाखल झाली तेव्हा डॉ. प्रमोद चौधरी यांनी सर्व चाचण्या केल्यानंतर या महिलेच्या गर्भपिशवीमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे निदान केले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी स्वतः या महिलेवर उपचार करत तिला जीवदान दिले.

यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार, डॉ देवश्री चौधरी यांच्यासह अधिपरिचारिका लता परदेशी, सिंधू सहारे, कर्मचारी विजय चौधरी या चमूने सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com