शेतकर्‍यांच्या लढ्याला यश; शेतमाल वाहतुकीसाठी गेट खुले

शेतकर्‍यांच्या लढ्याला यश; शेतमाल वाहतुकीसाठी गेट खुले

ओझर । वार्ताहर | Oze

येथील मरीमाता गेट शेतमाल वाहतुकीसाठी (Agricultural transport) खुले करावे असा आदेश निफाडच्या प्रांत डॉ.अर्चना पठारे (Province Dr. Archana Pathare) यांनी दिल्यानंतर एचएएल (HAL) प्रशासनाने त्याविरोधात सुरक्षेचे कारण देत जिल्हा न्यायालयात (District Court) अपील दाखल केले होते.

तर जिल्हा नियोजन बैठकीत (District Planning Meeting) आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनीही सदरचे गेट खुले करण्याची मागणी केली होती. अप्पर जिल्हा न्यायालयाने महिनाभरापूर्वीच निकाल देत प्रांत डॉ.अर्चना पठारे यांचे आदेश कायम ठेवत मरीमाता गेट खुले करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिल्याने अखेरीस गुरुवार दि.13 रोजी सायंकाळी प्रांत डॉ.अर्चना पठारे पोलीस बंदोबस्तात व एचएएल अधिकार्‍यांना बरोबर घेत मरीमाता गेट उघडण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेले गेट खुले झाल्याने शेतकर्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला.

येथील मरीमाता गेट व नॅशनल हायवे गेट नं.1 (National Highway Gate No.1) दरम्यानचा वहिवाट रस्ता एचएएल (HAL) प्रशासनाने करोना (corona) काळापासून बंद केला होता. त्यानंतर सदर रस्त्याच्या वाहतुकीमुळे एचएएलच्या नागरी वसाहतीच्या सुरक्षेला असलेबाबत कोणतेही पुरावे सादर केले नसल्याने व दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगांव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे गावच्या शेतकर्‍यांनी (farmers) दाखल केलेल्या 18 मार्च 2002 ची राज्य शासनाची अधिसूचना ही सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिसिद्ध जागा म्हणून

घोषित असली तरी जागेवरची परिस्थिती बघता एचएएल कंपनी (HAL Company) वसाहतीमध्ये कोणताही सबंध वादांकित रस्त्याचा येत नसल्याने फौजदार संहिता 1973 कलम 133 अन्वये वाहतुकीस खुला करुन देण्याचा आदेश निफाडच्या (niphad) प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे (Provincial Officer Dr. Archana Pathare) यांनी दिला होता. एचएएल प्रशासनाने त्याविरोधात अप्पर जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते.

त्यानुसार अप्पर जिल्हा न्यायालयात अ‍ॅड.संदिप पवार व अ‍ॅड.उत्तम कदम यांनी युक्तीवाद केला की शंभर वर्ष कदाचित त्याहून जास्त वर्षापासून शेतीमालासाठी याच वहीवाट करत असल्याने मरीमाता गेट रस्ता वहीवाटीसाठी प्रशासनाने खुला करून द्यावा असा दावा केल्याने न्यायालयाचे अप्पर जिल्हा न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी (Upper District Judge A.V. Gujarati) यांनी शेतकर्‍यांचे होणारे हाल व एचएएल प्रशासनाची दिरंगाई याचा युक्तीवाद ऐकून

प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी यापूर्वीचा दिलेला आदेश कायम ठेवत एचएएलने केलेले अपिल फेटाळले व गेट खुले करून देण्याचा एचएएल प्रशासनास गेल्या महिन्यापूर्वी दिला होता. परंतु रस्ता खुला करण्याची कारवाई केली जात नसल्याने आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकित गेट खुला करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या आदेशानुसार कारवाई करत ओझरचे मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी व कामगार तलाठी यांनी एचएएल प्रशासन पोलीस अधिकार्‍यांना सोबत घेत सदर मरीमता गेट वाहतुकीसाठी खुले केले.

त्यामुळे दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगांव, ओणे, कसबे व मौजे सुकेणे गावच्या शेतकर्‍यांच्या लढ्याला यश आले आहे. दिक्षी, सुकेणा पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या वतीने प्रतिभा धनवटे, भुषण धनवटे, रवींद्र माळोदे, संदिप जायभावे, अशोक कदम, रामभाऊ चौधरी, देवीदास चौधरी, आनंद गाडे, किशोर पागेरे, बोराडे, रमेशचंद्र घुगे, संदिप कातकाडे आदींनी दावा दाखल केला होता. तसेच अ‍ॅड.संदिप पवार व अ‍ॅड.उत्तम कदम यांनी शंतकर्‍यांच्या वतीने भक्कम जुने पुरावे व वहिवाटी बाबत बाजू मांडली व परिसरातील शेतकर्‍यांसाठी मोफत न्यायालयात युक्तीवाद करून हा लढा बळीराजासाठी यशस्वी केला.

शेतकर्‍यांना न्याय गेल्या दोन वर्षांपासून ओझर, सुकेणा या पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या वाहतुकीस होणारी अडचण दूर होण्यासाठी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. अनेक वेळेस जिल्हाधिकार्‍यांसमवेत एचएएल कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. सोमवार दि.10 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडेही संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी मरीमाता गेट खुले करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला.

- दिलीप बनकर, आमदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com