आ. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश; 'हा' रस्ता होणार स्मार्ट

आ.देवयानी फरांदे
आ.देवयानी फरांदे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी (Sharanpur Police Station) व सीबीएस (CBS) ते कॅनडा कॉर्नर हे दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांचे

काँक्रिटीकरण (Concreting of roads) करून हे रस्ते स्मार्ट (smart road) होणार आहे. आ. देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. नाशिक महानगरपालिकेचा (Nashik Municipal Corporation) सन 2023 24 चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून यात या रस्त्याचा समावेश केल्यामुळे लवकरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून रस्ता स्मार्ट होणार आहे.

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचे काम स्मार्ट सिटी (smart city) अंतर्गत करण्यात आले होते, कॅनडा कॉर्नर ते महात्मा नगर हा रस्ता देखील काँक्रिटीकरण करण्यात आला होता. परंतु नाशिक महानगरपालिकेसमोरील कॅनडा कॉर्नर ते सीबीएस रस्ता मात्र डांबरी रस्ताच होता.

पावसाळ्यात (monsoon) या रस्त्यावर पाणी जात असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साठण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या रस्त्याचा समावेश स्मार्ट सिटी (smart city) योजनेअंतर्गत करून हा रस्ता स्मार्ट होणे गरजेचे असल्याचे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले होते. तसेच जुना गंगापूर नाका ते शरणपुर पोलीस चौकी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्याचे ही काँक्रिटीकरण करणे गरजेचे होते. या दोन्ही रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी होण्यासाठी आ. फरांदे यांनी प्रयत्न केले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com