यशासाठी ध्येयनिश्चिती गरजेचे: प्रा. बानुगडे

यशासाठी ध्येयनिश्चिती गरजेचे: प्रा. बानुगडे

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

कळवण (kalwan) येथील श्री गुरुदत्त शिक्षण संस्था (Shri Gurudatta Shikshan Sanstha) संचलित शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे (Sharad Pawar International School) वार्षिक स्नेहसंमेलन (Annual get-together) व शालेय प्रांगणात उभारलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या नेत्रदीपक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे- पाटील व नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik District Rural Superintendent of Police Sachin Patil) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय विविध क्षेत्रातील चमकदार कामगिरी करिता चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार होते. विशेष अतिथी म्हणून कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनंत पवार (Medical Officer of Kalvan Sub-District Hospital Anant Pawar) उपस्थित होते. सचिन पाटील यांनी शरद पवार इंटरनॅशनल स्कूल हे एक आदर्श गुरुकुल आहे असे शाळेसंबंधी गौरवोद्गार काढून विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपला शैक्षणिक जीवनपट उलगडून दाखवला व कोणतेही यश मिळवण्यासाठी ध्येयनिश्चिती केली पाहिजे जोपर्यंत तुमचे इच्छित ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करणे सोडू नका असे सांगितले.

प्रा. नितीन बानुगडे पाटलांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिवाजी महाराजांची कार्यकर्तृत्वाचा उलगडा करून सांगताना आजच्या तरुण पिढीला (younger generation) आधुनिक शिक्षणाबरोबरच चारित्र्य शिक्षणाचीही तसेच शिवाजी महाराजांच्या आचार विचारांची गरज आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले, की आपले भवितव्य घडवित असताना देशाच्या हिताचा विचार झाला पाहिजे. सर्व सुविधांनी युक्त अशा या शरद पवार इंटरनॅशनल गुरुकुलात आपल्या पाल्यांचे भवितव्य सुरक्षित असल्याचे पालकांना सांगितले. डॉ. जे. डी. पवार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासाकडे ही जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.

शाळेचे प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा उपस्थितांसमोर सादर केला. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सोहळ्यात नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगभूमीवर वेगवेगळे नृत्य प्रकार सादर करताना एरियल डान्स, लावणी, राजस्थानी घूमर, गौरव महाराष्ट्राचा, देशी हिप हॉप, एरियल क्यूब, मिलिटरी क्ट, एज्युकेशन थीम, साऊथ डान्स मस्ती, लेसर क्ट,मल्लखांब व जिम्नॅस्टिकच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसोबताच हिंदी सिनेमासृष्टीने नुकत्याच गमावलेल्या महान गायिका, गानकोकिळा लता मंगेशकर व संगीतकार बप्पी लहरी यांना गाण्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाप्रसंगी कळवण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, कळवणचे तहसीलदार कापसे, पोलीस निरीक्षक नागरे, मविप्र संचालक अशोक पवार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्षा मीनाक्षी ताई पवार, शाळेचे चेअरमन शैलेश पवार, सचिव अनुप पवार, डॉ. आनंदराव पाटील, डॉ. चैताली पाटील, जुई पाटील, स्कूल कमिटी चेअरमन विलास शिरोरे, गजानन सोनजे, डॉ. जयवंत पवार, हिरामण पाटील, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य जे.एल.पटेल, श्रावण आहेर, श्री गुरुदत्त शिक्षण संस्थांच्या सर्व शाखांचे प्राचार्य व कर्मचारीवर्ग, विद्यार्थी - पालक, कळवण शहरातील मान्यवर पत्रकार, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.