
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येथे नुकत्याच झालेल्या डी. एस. ओ. जलतरण स्पर्धेत अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनेक पदके जिंकली आहेत...
अशोका ग्लोबल अकादमीमधील अविका राठी हिने ५० मीटर फ्री स्टाईल व (Backstrok) स्पर्धेत (तालूका स्तर) प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.
अशोका युनिव्हर्सल स्कूल, अशोका मार्ग येथील १४ वर्षाखालील वयोगटात ओवी शहाणे हिने ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, या जिल्हास्तरीय कामगिरीव्यतिरिक्त तिने सप्टेंबर २०२२ मध्ये बंगलोर येथे झालेल्या CISCE राष्ट्रीय क्रीडा आणि खेळांमध्ये देखील कांस्यपदक मिळवले होते.
१७ वर्षाखालील वयोगटात आत्मजा शहाणे हिने ५० मीटर, १०० मीटर व २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
अशोकाच्या अर्जुननगर शाखेच्या आवारात विद्यार्थ्यांना पोहण्याचा सराव करण्यासाठी सेमी ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आहे तसेच तज्ञ प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पोहण्याचे उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध आहे. अशोका ग्लोबल अकादमीचे प्रशिक्षक रोहन सूर्यवंशी हे विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना म्हणाले की, एकाग्रता, सराव हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
अशोका ग्लोबल अकादमीच्या प्राचार्या सुदिप्ता दत्ता, उपप्राचार्या अनुत्तमा पंडित आणि क्रीडाप्रमुख कार्यानंद शर्मा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. अशोका युनिव्हर्सल स्कूल, अशोका मार्ग येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका जोशी तसेच अशोका ग्रुप ऑफ स्कूलच्या सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.