
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
१० व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंचे घवघवीत यश मिळविल्याबद्दल माजी नगरसेवक राकेश दोंदे (Rakesh Donde) यांनी विजेत्या खेळाडूंचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या...
१३ ते १६ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे झालेल्या १० व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत नाशिक मधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
यावेळी 12 ते 13 वर्षे वयोगटात गंडा या प्रकारात महाराष्ट्र संघाला प्रेम विश्वकर्मा व प्रथमेश दातीर या खेळाडूंनी कोरिओग्रफ मार्शल आर्ट फाईटचे प्रात्यक्षिके सादर करून सलग सातव्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम केला.
तसेच फाईट या प्रकारात प्रेम विश्वकर्मा याने दुसरे सुवर्ण पदक जिंकण्यात यश मिळवले तर आर्यन पटेल याने अटीतटीच्या सामन्यात रौप्य पदक जिंकण्यात यश मिळवले.
या सर्व विजेत्या खेळाडूंचे माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी अभिनंदन करून खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार केला. तसेच यापुढे लागणारी सर्व मदत करणार असल्याचे जाहीर केले.
त्यांनी यापूर्वीही पिंच्याक सिलाट च्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशन चे अध्यक्ष किशोर येवले यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन कौतुक केले. या सर्व विजेत्या खेळाडूंना नागेश बनसोडे, आकाश धबडगे ,योगेश पानपाटिल, भारत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.