राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत नाशिक ग्रामीण च्या खेळाडूंचे यश

राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत नाशिक ग्रामीण च्या खेळाडूंचे यश

नाशिक।१०,प्रतिनिधी

महाराष्ट्र (Maharashtra) पिंच्याक सिलाट असोसिएशनतर्फे (Pencak Silat Asocialtion) रायगड (Raigad) येथील कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट अजिंक्यपद स्पर्धेत (state-level Pencak Silat competition) पिन्चाक सिलाट असोसिएशन ऑफ नाशिक ग्रामीण संघाने २ सुवर्ण २ रौप्य व ११ कास्य पदक मिळवत घवघवीत यश मिळविले आहे.

यामध्ये आर्यन पटेल व श्रद्धा चव्हाण यांनी सुवर्णपदक (Gold medal) तर दिनेश मोरे व पृथ्वीराज चव्हाण या खेळाडूंनी रौप्य पदक (Silver medal) जिंकले. लक्ष्मी शेवाळे, गौरी चव्हाण, ईश्वरी पाटील, साहिल दातार, प्रथमेश दातीर, प्रेम विश्वकर्मा, अनिकेत विश्वकर्मा, कार्तिक माळी, दक्ष विश्वकर्मा, गौरी दातीर व ऋषिकेश सोनार या खेळाडूंना कांस्य पदक (Bronze medal) जिंकण्यात यश आले.

स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंची निवड जम्मू-काश्‍मीर (Jammu and Kashmir) व हरयाणा (Haryana) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना नागेश बनसोडे, आकाश धबडगे, योगेश पानपाटील व भारत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, महाराष्ट्र पिन्चाक सिलाट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले, एस. पी. सिंग यांच्या हस्ते मेडल देऊन खेळाडूंना पुरस्कृत करण्यात आले. या प्रसंगी सचिन विश्वकर्मा व रतिराम पटेल उपस्थित होते. त्यांनी मोलाचे सहकार्य करुन खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा (Indonesian Martial Arts) प्रकार असून भारत देश व संपूर्ण महाराष्ट्रभर हा खेळ वाढविण्यासाठी इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले हे २००९ पासून प्रयत्न करत असून त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने या खेळाला भारतीय क्रीडा मंत्रालयाने (Indian Ministry of Sports) मान्यता देत राखीव नोकर भरतीत समावेश केलेला आहे.

या खेळाला युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार (Ministry of Youth Welfare and Sports Government of India), भारतीय विश्वविद्यालय संघ, (Indian University Association), अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड (All India Police Sports Control Board) व ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (Olympic Council of Asia) ची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, बीच गेम, युथ गेम व भारतीय विश्वविद्यालय अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑफिशियल स्पर्धांमध्ये खेळला जातो.

नुकताच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने या खेळाला शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना या खेळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com