तंत्रप्रदर्शनात मविप्र आयटीआयचे यश

तंत्रप्रदर्शनात मविप्र आयटीआयचे यश

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय (District Vocational Education and Training Office) यांच्यावतीने सातपूर (satpur) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (Government Industrial Training Institute) घेण्यात आलेल्या

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात (District Level Technique Exhibition) येथील मविप्र (MVP) आयटीआयतील (ITI) विद्यार्थ्यांनी (students) सादर केलेल्या ‘व्हेईकल अ‍ॅक्सिडेंट कंट्रोल’ (Vehicle Accident Control) या प्रकल्पास गौरवण्यात आले.

प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध संस्थांनी संशोधनपर प्रकल्प (Research projects) सादर केले होते. येथील आयटीआयच्या रोशन वारुंगसे, दिवेश काकड, ऋषिकेश आवारे, सुरज साबळे, जाईद पठाण व सौरभ दराडे यांनी सादर केलेल्या प्रकल्पाचे सर्वांनी कौतुक केले. बर्‍याच वेळा रात्रीच्या प्रवासात चालकाला डुलकी येते आणि अपघात (accidents) होऊन जीव गमवावा लागण्याच्या घटना नेहमीच कानावर येतात. मात्र, प्रोटेक्शन सिस्टीम (Protection System) या यंत्राच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी होत असलेले अपघात टाळणे शक्य होणार आहे.

या खास यंत्राद्वारे आपले डोळे काही काळ मिटले गेले तर सेन्सरद्वारे (sensor) ते सेन्स होते आणि पार्किंग अलार्म सिग्नल (Parking alarm signal) देतो. श्वसन आणि शरीराची हालचाल मोजण्यासाठी बायो मोशन सेन्सर (Bio motion sensor) वापरुन आपल्या झोपेचा लांबूनच मागोवा घेतो आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी चालकाला झोप आली असता अलार्म वाजतो. यासोबत गाडी साईड पार्किंगसाठी मागील वाहनाला पार्किंग इंडिकेटर (Parking indicator) देतो.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आय. एम. काकड, उपसंचालक प्राचार्य रवींद्र मुंडासे, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तंत्रप्रदर्शनात सहभाग व बक्षीस मिळालेल्या विद्यार्थी व निदेशकांना मविप्र संचालक कृष्णाजी भगत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी आयटीआयचे प्राचार्य आर. बी. पाटील, निदेशक पी. के. बोरसे, के. पी. मुळक, सी. पी. शिर्पे उपस्थित होते. या यशाबद्दल मविप्र सरचिटणीस डॉ. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com