नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुरुवातीपासूनच ज्या गोष्टींची आवड आहे त्याच दिशेने वाटचाल करावी. त्याच गोष्टीत करिअर घडवावे. माणसाने खूप मेहनत केली पाहिजे, मेहनत करून अपयश आले तरी त्याचा पश्चाताप होत नाही.

साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय! स्त्री कितीही मॉडर्न कपडे वापरत असली तरी सणसमारंभात आवर्जून साडी नेसण्याकडे तिचा कल असतो. कपाटात साड्यांचा संग्रह करणे हा अनेक स्त्रियांचा छंद असतो. अशा अनेक स्त्रियांच्या छंद पुरवणारा एक लोकप्रिय आणि विश्वसनीय ब्रँड म्हणजे ‘शाम सिल्क अँड सारीज’! वर्षानुवर्षे ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार्या ‘शाम सिल्क’ची धुरा आता युवा उद्योजक तुषार मणियार सांभाळत आहेत.

अगदी कमी कालावधीत आज सर्व आघाड्यांवर यशस्वीरित्या काम करणार्या तुषार यांचा प्रवासही तेवढाच चित्ताकर्षक आहे. त्यांचे वडील पूर्वी शेती करत असे. त्यामुळे आपल्या शिक्षणासाठी ते नाशिकमध्ये चुलत्यांकडे आले. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळाले. चुलत्यांचे मेडिकल स्टोअर आहे. तुषार 10 वीपासूनच दररोज वेळ मिळेल तेव्हा आणि सुटीच्या दिवशी पूर्ण वेळ मेडिकलवर जात. त्यामुळे व्यवसाय कसा करावा? व्यवसायात असणारे बारकावे, बँकेत जाणे, व्यवहार बघणे व व्यवसायाभिमुख राहणे अशा अनेक गोष्टींचे ज्ञान त्यांना मेडिकल स्टोअरमध्ये मिळाले.

दहावी-बारावी म्हणजे किशोरवयातून तरुण वयात पदार्पण असते. या वयात शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी व्यवसायाचे धडे घेतले. पुढे तुषार यांनी नाशिकमध्येच आपले उच्चशिक्षण देखील पूर्ण केले. एमबीए पदवी मिळवली. पुढे जाऊन ‘नाशिक टेक्सटाइल मार्केट’ नावाने निफाड तालुक्यातील ओझर येथे कपड्यांचे शोरूम सुरू केले. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेक्सटाइल मार्केट म्हणून हे शोरुम ओळखले जाते. शहरातील आणि आसपासचे सर्व छोटे-मोठे व्यावसायिक व्यवसायासाठी लागणारा माल खरेदीसाठी बाहेर जावे लागत असे.

आता या दालनात बनारस, बँगलोर, कोलकाता, सुरत येथील विविध प्रकारच्या, रंग, पोत, डिझाइन असलेल्या तसेच विविध प्रांतांतल्या साड्या, दक्षिण व उत्तर भारतातील सर्व प्रकारचे कपडे एका छताखाली उपलब्ध आहेत. काळानुसार बदल घडवत आता ‘शाम सिल्क अँड सारीज’मध्ये रेडिमेड कपडे, लहान मुलांचे कपडे, घागरा ओढणी, भारतातील सर्व अत्याधुनिक ब्रँडचे कापड, बेडशीट, हॅन्डलूमदेखील उपलब्ध आहेत. मडिक्सीफ या नामांकित ब्रँडची नाशिक जिल्ह्याची अधिकृत डिलरशीप मणियार यांच्याकडे आहे. अशा पद्धतीने मेहनती तुषार यांनी आपल्या आधीच्या पिढीकडून स्वतःकडे पैशांच्या श्रीमंतीशिवाय रूढी-परंपरा आणि उद्योजकीय गुणांचा वारसा पुढे नेला आहे. त्यासोबतच उद्योगाची कास धरून ते आज यशस्वी वाटचाल करीत आहेत.