कठोर परिश्रमानेच यशप्राप्ती

कठोर परिश्रमानेच यशप्राप्ती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देवीच्या रूपांत असलेली स्वभावाची, आचार-विचारांची, कर्तृत्वाची एकेक ताकद आपल्याला प्रकर्षाने जाणवते. देवीची ही खरी रूपे आपल्या आजूबाजूला असलेल्या महिलांमध्ये दिसतात. विशिष्ट कामांवर पुरुषांचीच मक्तेदारी मानली जाते. मात्र आजच्या आधुनिक काळात त्या समजला छेद देणार्‍या नवदुर्गा Navdurga पुढे येत आहेत. सराफी व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्‍या नाशिकच्या दागिने उत्पादक आणि डिझायनर स्वाती टकले Jewelry manufacturer and designer Swati Takle यांनी ‘देशदूत नवदुर्गा’ Deshdoot- Navdurga उपक्रमात ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांच्याशी गप्पा मारल्या. आपले अनुभव सांगितले.

1987 ला व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी या क्षेत्रात महिला तितक्या कार्यरत नव्हत्या. अशावेळी राजकोट येथे जावून ज्वेलरी मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये प्रशिक्षण घेतले. सोन्याची तार काढणे, वाट्या, चैन आदी तयार करण्यापासून सुरुवात केली. पुढे वाटचाल करताना इतर महिलांना त्याचे प्रशिक्षण देवून त्यांना कुशल केले, असे स्वाती टकले यांनी सांगितले.

सराफी व्यवसायात वेगळा ठसा उमटवण्यासाठी स्वतःचे डिझाईन विकसित केले. ते डिझाईन आता नाशिक तसेच महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाले आहेत. मी तयार केलेलं मंगळसूत्र डिझाईन्स स्त्रियांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. हा व्यवसाय जोखमीचा आहे. त्यासाठी माणसांची काळजीपूर्वक निवड करावी लागते, पण वेगळे काही करून दाखवण्याची जिद्द होती. दागिन्यांसाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या कुटुंबातून मी आले होते. तरीही मी स्वतःचा मार्ग शोधत होते.

कामांचा व्याप वाढत गेला तसे व्यवसायात काळानुरुप बदल केले. सोन्याच्या व्यवसायातून मोत्याच्या व्यवसायावरही लक्ष केंद्रित केले. लोकांची गरज आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी लक्षात घेऊन परवडेल, असे दागिने तयार करायला सुरूवात केली, हे टकले यांनी आवर्जून सांगितले.

सगळ्याच क्षेत्रात आता महिला कार्यरत आहेत. तशाच या क्षेत्रातदेखील महिला काम करीत आहेत. माझी मुलगी शिकून माझ्यापेक्षा उत्तम कलाकारी करीत आहे. कर्तृत्व गाजवत असताना प्रत्येक स्त्रीला घरातील सहकार्‍यांचा आधार आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. देवीची सगळीच रूपे मला भावतात. त्यातूनच मनोबल मिळते. हे मनोबल प्रत्येक महिलेला मिळणे गरजेचे आहे, असे स्वाती टकले यांनी सांगितले.

कर्तृत्व गाजवण्याची जिद्द हवी

कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करु शकतात. त्यासाठी भीती न बाळगता किंवा विश्रांती न घेता आपल्या स्वप्नांसाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात वाढ होण्यासाठी कामात प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातून पाठिंबा महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा आणि जिद्द असली पाहिजे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com