बालविवाह रोेखण्यात यश

बालविवाह रोेखण्यात यश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक व त्र्यंबक तालुक्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह उरकण्याचा प्रयत्न उधळून लावण्यास जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागााला यश आले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंबंधी महिला व बालकल्याण विभागाला निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी सहकार्‍यांच्या मदतीने देवरगाव (ता.नाशिक )व धुमळपाडा( ता. त्रंबक) येथे कारवाई केली. मुलगी 12 वर्षांची होती. देवरगावची मुलगी साडेसोळा वर्षांची होती.

शासनाने विवाह योग्य वय हे मुलाचे 21 व मुलीचे 18 ठरून दिले आहे तरीसुद्धा अनिष्ठ रूढी परंपरांच्या विळख्यात व चुकीच्या धारणेतून ग्रामीण भागात बालविवाह केले जातात. या बालविवाहांना प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा केला असून बालविवाहास कारणीभूत ठरणार्या सर्व व्यक्तींना शिक्षेची तरदूत यामध्ये करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम बाल दक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.

सरपंच, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी सेविका, यांच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यास पहिल्याच आठवड्यात यश आले आहे. प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील काळात 18 वर्षांखालील मुलींची नोंदणी केली जाणार असून गावात होणार्‍या विवाहांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

बालविवाह होणार असल्याची कुठलीही माहिती मिळाल्यास1098 या क्रमांकावर संपर्क साधावा, माहिती कक्षाकडून माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे दीपक चाटे यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com