चिंचलेखैरे
चिंचलेखैरे
नाशिक

रोज तेरा किलोमीटर पायपीट करुन दहावीत मिळवले यश

चिचले खैरे गाव : विद्यार्थी चमकले

Kundan Rajput

नाशिक l Nashik

इगतपुरी तालुक्यातील चिचले खैरे हे छोटेसे खेडेगाव. सोयी सुविधांचा अभाव. पण समस्यांचा पाढा न वाचता रोज शाळेत व महाविद्यालयात जाण्यासाठी १३ किलोमीटर पायपीट करुन येथील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परिक्षेत यश मिळवत गावाचे नाव रोशन केले.

या खेड्यातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या निकालात चमक दाखविली. खेड्यातील सुमारे बारा विद्यार्थी बारावी व दहावी उत्तीर्ण झाले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१९ -२०२० साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा दहावी आणि बारावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला.

चिंचले खैरे हे गाव खूप दुर्गम असून मुख्य प्रवाहातून पूर्णपणे कापले गेले आहे. गावाला वाहतुकीसाठी योग्य रस्ता नाही. गावात फक्त सातवीपर्यंत शाळा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना इगतपुरी शहरातील तालुका ठिकाणी शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे आणि वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे लागते. गावाला जाण्यासाठी बस सुविधा नसल्याने त्यांना दररोज सुमारे 13 किलोमीटर अंतरावर पायी कापावे लागते.

या विद्यार्थ्यांनी हे यश फक्त शाळांमध्येच नव्हे तर त्यांच्या पालकांना रोजंदारीत कामाला हातभार लावून मिळवले आहे. गावात विजेचा अभाव आहे. महावितरणला येथे काही समस्या उद्भवल्यास वीज कनेक्शन दुरुस्त करण्यास तीन ते चार दिवस लागतात.

अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी समस्यांचा बाऊ न करता अंधारावर मात करुन गावाचे नाव रोशन केले.

बारावी परिक्षा निकाल (टक्के)

पूजा उघाडे - ६९

तनिषा भगत - ६५

वनिता खडके - ६१

तुळशीबाई ठाकरे - ४४

रत्न शिद - ४४

संजय आवळी - ४७

दहावीचा निकाल

मंगल उघाडे - ६५

नयन शिद ५६

निर्मला उघाडे - ५१

कृष्णा भुकरे - ४५

Deshdoot
www.deshdoot.com