मनपा सेवकांचा गोपनीय अहवाल सादर करा: पदोन्नती समिती

मनपा सेवकांचा गोपनीय अहवाल सादर करा: पदोन्नती समिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) अधिकारी तसेच सेवकांसाठी आगामी वर्षासाठी पदोन्नती समिती (Promotion Committee) गठीत झाली असून समितीने कामकाज सुरू केला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांचा विचार समिती करणार आहे.

यामुळे महापालिकेतील अधिकारी तसेच सेवकांचा अहवाल (Report of employees) समितीकडे सादर करण्यात यावा, असे पत्र समितीच्या वतीने महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेत एकूण सुमारे साडेचार हजार अधिकारी व सेवक काम करतात. तर दर महिन्याला सुमारे 60 कोटी रुपये त्यांना पगार (salary) देण्यासाठी लागतात.

पदोन्नती मिळाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर आणखी भार पडणार आहे. सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असली तरी दर महिन्याला जीएसटीचा (GST) परतावा म्हणून नाशिक महापालिकेला सुमारे 100 कोटी रुपये येतात. त्यामुळे अधिकारी व सेवकांचे पगारसह निवृत्त झालेल्या सेवकांना निवृत्तीवेतन अदा करण्यात येत असतो. दरम्यान समिती 31 ऑगस्ट 2022 पर्यंत रिक्त झालेली पदे तसेच 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होणारी रिक्त पदे यांची माहिती गोळा करून पदोन्नतीची शिफारस करणार आहे.

अशी आहे समिती

मनपाचे अतिरिक्त आयुक्त (शहर) समितीचे अध्यक्ष आहे. तर मनपा प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील हे सदस्य सचिव म्हणून काम पाहत आहे. तर महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी, कर उपायुक्त तसेच सर्व विभाग प्रमुख समिती सदस्य आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com