
नाशिक । Nashik
अल्पसंख्यांक विभागांतर्गत (Minority section) असणाऱ्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा (Infrastructure) पुरविण्यासाठी २०२२ - २०२३ या वर्षाकरीता अनुदान योजना (Anudan Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता इच्छुक शाळांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (Collector's Office Nashik) येथे प्रस्ताव सादर करावेत, असे नाशिक जिल्हा नियोजन समितीचे (District Planning Committee) जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी (District Planning Officer Kiran Joshi) यांनी कळविले आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी (Minority students) बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, या पात्र शाळांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून शासनास प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.