सलग सात वर्षांपासून 'ते' धावतायेत ‘नाशिक ते शिर्डी’

सलग सात वर्षांपासून 'ते' धावतायेत ‘नाशिक ते शिर्डी’

नाशिक | Nashik

करोना जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी नुकतीच नाशिक ते शिर्डी ९० किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले. करोनातील ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घातले.

जांगडा यांनी शनिवारी पहाटे नाशिक शहरातून धावण्यास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांनी नाशिक ते शिर्डी अंतर पूर्ण करत शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन घेत कोरोनासह ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साकडे घातले.

यावेळी त्यांच्या समवेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा, राजेश इसर्वाल, राजवीर जांगडा,मोहित जांगडा, राहुल जांगडा, योगिता निकम राजपूत, रुपाली मुंढे, दिनेश जांगडा, नवीन वर्मा आदी सहभागी झाले होते.

गेल्या सहा वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत आहेत.

सुभाष जांगडा यांचे यंदाचे सातवे वर्ष असून त्यांनी नाशिक ते शिर्डी हे ९० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करत कोरोनाविषयक ऑमिक्रॉन या व्हेरीयंटबाबत जनजगृती केली. या अगोदर जांगडा यांनी बेटी बचाव, बेटी पढाओ, स्त्री भृण हत्या, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव मोहीम याबाबत त्यांनी जनजागृती केली आहे.

यंदाच्या वर्षी त्यांनी कोरोना विषयक जनजागृती करत कोरोनातीसह ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साईचरणी साकडे घातले. तसेच कोरोना विषयक दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

सुभाष जांगडा यांचे नाशिकरोड, सिन्नर, पांगरी, वावी यासह गावागावात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या सोबत असलेले सहकारी देखील त्यांचा सोबत धावले. शिर्डी येथे पोहचल्यानंतर याठिकाणी सुभाष जांगडा यांचा सत्कार करण्यात आला.

कोण आहेत सुभाष जांगडा?

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनमध्ये महत्वाच्या पदावर काम पाहत आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com