दिव्यांग विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन परीक्षा देता येणार

६७६ अंध विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
दिव्यांग विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन परीक्षा देता येणार


नाशिक | Nashik
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा आता दिव्यांग(अंध)विद्यार्थ्यांनाही देता येणार आहेत.

विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा प्रणालीमध्ये अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची सुविधा निर्माण केली असून, अंध विद्यार्थ्यांना टेक्स्ट टू ऑडियो तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा देता येईल.


विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांच्या ६७६ अंध विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी आहे. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक घेणे किंवा वीस मिनिटे अधिकचा वेळ असे दोन पर्याय विद्यापीठाकडून दिले जातात. मात्र करोना काळात लेखनिक नको, आम्ही अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा देऊ इच्छितो असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले होते.

त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला. त्यातून अ‍ॅक्सेसेबिलिटीचा विषय पुढे आला. ऑनलाइन परीक्षेसाठीच्या प्रणालीमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटीनुसार बदल करणे हे मोठे काम होते. मात्र परीक्षा घेण्याचे काम विद्यापीठाच्याच फाउंडेशनकडे असल्याने अ‍ॅक्सेसेबिलिटीसाठीचे आवश्यक बदल करून ऑनलाइन प्रश्नपत्रिकेत प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय श्राव्य पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर आणण्यात आले.

स्वत: परीक्षा देण्यासाठी विनंती केलेल्या विद्यार्थ्यांपैकी युवराज झांझडे या विद्यार्थ्याची प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा यशस्वी पूर्ण झाली आणि त्याचा निकालही तयार झाला. स्वत:ला परीक्षा देता आल्याबद्दल विद्यार्थ्याने लघुसंदेश पाठवून आनंद व्यक्त केला, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

‘करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा देण्यात बऱ्याच अडचणी होत्या. आता विद्यापीठाची परीक्षाप्रणाली सहायक झाल्यामुळे अंध विद्यार्थी स्वयंपूर्ण झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com